इतिहासाची पाने चाळताना 'महाराष्ट्र दिन'

इतिहासाची पाने चाळताना 'महाराष्ट्र दिन'


1 मे हा महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन. याच दिवशी 1960 साली तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. पंडितजींनी यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगलकलश दिला आणि नव्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपविली. तसा महाराष्ट्राचा ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक वारसा फार मोठा आहे. राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपासून देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत आणि त्यानंतरही देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्राने हिरीरीने सहभाग घेतला आहे. प्राचीन संस्कृतीचा वारसा सांभाळतानाच देशाच्या विकासातही योगदान दिले आहे. महाराष्ट्राचा धार्मिक सुधारणांचा, सामाजिक सुधारणांचा इतिहास प्रेरणादायी आहे. राज्याचे विविधांगी भावविश्व् थक्क करणारे आहे.

१ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो. युरोपात १ मे रोजी मेपोल हा काठी महोत्सवसुद्धा साजरा होत असतो.


महात्मा गांधीजींनी महाराष्ट्र म्हणजे कार्यकर्त्यांचे मोहोळ अशा शब्दांत महाराष्ट्राची प्रशंसा केली. ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या महान कवयित्री महादेवी वर्मांनी महाराष्ट्र हा भारताच्या सिंहद्वाराचा प्रहरी आहे, अशा शब्दात गौरव केला. महाराष्ट्र ही संत-महंत, ऋषि-मुनींची जशी भूमी आहे तशीच शूरवीरांचीही आहे. या भूमीला पराक्रमाची, त्यागाची, देशप्रेमाची परंपरा लाभली आहे. छत्रपती शिवरायांनी सर्वधर्मसमभावाचे पालन केले. हिंदवी स्वराज्य, रयतेचे राज्य स्थापन केले. छत्रपती शिवरायांपासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातील क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके, उमाजी नाईक, गोपाळ कृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, राजगुरु, नाना पाटील यासारख्या अनेक देशभक्तांनी इंग्रजांविरुध्द लढा उभारला. अतोनात कष्ट, यातना सहन केल्या. त्यासाठी प्राणांचीही पर्वा केली नाही.


संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वार, संत मुक्ताबाई, संत नामदेव, संत तुकाराम, समर्थ रामदास, संत गोरा कुंभार, संत सावतामाळी, संत नरहरी सोनार, सेना महाराज, संत जनाबाई, संत चोखामेळा, संत कान्होपात्रा, संत एकनाथ, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज अशा संतांच्या मांदियाळीने महाराष्ट्र मनाचे संवर्धन, पोषण करण्याचा प्रयत्न केला. सामाजिक विचार रुजविण्याचा प्रयत्न केला. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महर्षी अण्णासाहेब कर्वे, कर्मवीर शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील यासारख्या समाजसुधारकांनी समाज प्रबोधनासाठी अपार कष्ट घेतले.

देशाच्या स्वातंत्र्याचे स्वप्न पहात असतांनाच द्विभाषिक राज्याचे एक शक्तीशाली राज्य व्हावे यासाठी लोकनेते, बुध्दीवादी, लेखक, पत्रकार यांनी मराठी भाषिक प्रदेशएकत्र आणण्याची कल्पना मांडली. एस.एम.जोशी, आचार्य प्र.के.अत्रे, कॉ.श्रीपाद अमृत डांगे, सेनापती बापट, प्रबोधनकार ठाकरे यांच्यासह अनेक जण नवमहाराष्ट्रासाठी एक झाले आणि संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार केले.

२१ नोव्हेंबर इ.स.१९५६ दिवशी फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते कारण राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले त्यामुळे मराठी माणसे चिडली होती. सर्वत्र छोट्यामोठ्या सभांमधून या निर्णयाचा निषेध होत होता. या संगठनामुळे कामगारांचा एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनासमोरील चौकात येण्याचे नियोजन झाले.

त्यानंतर प्रचंड जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून व दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत, फ्लोरा फाउंटनकडे जमला. मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. मात्र अढळ सत्याग्रहीं मुळे पोलिसांचे हे प्रयत्न अयशस्वी झाले आणि पोलिसांना गोळीबाराचा आदेश मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे देण्यात आला. गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०६ आंदोलक हुतात्मे झाले.

या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारने नमते घेऊन १ मे, इ.स. १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली. त्यानंतर इ.स. १९६५मध्ये त्या जागी हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली.

हुतात्म्यांची नावे
२१ नोव्हेंबर इ. स. १९५६ चे हुतात्मे


  1. सिताराम बनाजी पवार
  2. जोसेफ डेव्हिड पेजारकर
  3. चिमणलाल डी. शेठ
  4. भास्कर नारायण कामतेकर
  5. रामचंद्र सेवाराम
  6. शंकर खोटे
  7. धर्माजी गंगाराम नागवेकर
  8. रामचंद्र लक्ष्मण जाधव
  9. के. जे. झेवियर
  10. पी. एस. जॉन
  11. शरद जी. वाणी
  12. वेदीसिंग
  13. रामचंद्र भाटीया
  14. गंगाराम गुणाजी
  15. गजानन ऊर्फ बंडू गोखले
  16. निवृत्ती विठोबा मोरे
  17. आत्माराम पुरुषोत्तम पानवलकर
  18. बालप्पा मुतण्णा कामाठी
  19. धोंडू लक्ष्मण पारडूले
  20. भाऊ सखाराम कदम
  21. यशवंत बाबाजी भगत
  22. गोविंद बाबूराव जोगल
  23. पांडूरंग धोंडू धाडवे
  24. गोपाळ चिमाजी कोरडे
  25. पांडूरंग बाबाजी जाधव
  26. बाबू हरी दाते
  27. अनुप माहावीर
  28. विनायक पांचाळ
  29. सिताराम गणपत म्हादे
  30. सुभाष भिवा बोरकर
  31. गणपत रामा तानकर
  32. सिताराम गयादीन
  33. गोरखनाथ रावजी जगताप
  34. महमद अली
  35. तुळशीराम पुंजाजी बेलसरे
  36. देवाजी सखाराम पाटील
  37. शामलाल जेठानंद
  38. सदाशिव महादेव भोसले
  39. भिकाजी पांडूरंग रंगाटे
  40. वासुदेव सुर्याजी मांजरेकर
  41. भिकाजी बाबू बांबरकर
  42. सखाराम श्रीपत ढमाले
  43. नरेंद्र नारायण प्रधान
  44. शंकर गोपाल कुष्टे
  45. दत्ताराम कृष्णा सावंत
  46. बबन बापू भरगुडे
  47. विष्णू सखाराम बने
  48. सिताराम धोंडू राडये
  49. तुकाराम धोंडू शिंदे
  50. विठ्ठल गंगाराम मोरे
  51. रामा लखन विंदा
  52. एडवीन आमब्रोझ साळवी
  53. बाबा महादू सावंत
  54. वसंत द्वारकानाथ कन्याळकर
  55. विठ्ठल दौलत साळुंखे
  56. रामनाथ पांडूरंग अमृते
  57. परशुराम अंबाजी देसाई
  58. घनश्याम बाबू कोलार
  59. धोंडू रामकृष्ण सुतार
  60. मुनीमजी बलदेव पांडे
  61. मारुती विठोबा म्हस्के
  62. भाऊ कोंडीबा भास्कर
  63. धोंडो राघो पुजारी
  64. ह्रुदयसिंग दारजेसिंग
  65. पांडू माहादू अवरीरकर
  66. शंकर विठोबा राणे
  67. विजयकुमार सदाशिव भडेकर
  68. कृष्णाजी गणू शिंदे
  69. रामचंद्र विठ्ठल चौगुले
  70. धोंडू भागू जाधव
  71. रघुनाथ सखाराम बीनगुडे
  72. काशीनाथ गोविंद चिंदरकर
  73. करपैया किरमल देवेंद्र
  74. चुलाराम मुंबराज
  75. बालमोहन
  76. अनंता
  77. गंगाराम विष्णू गुरव
  78. रत्नु गोंदिवरे
  79. सय्यद कासम
  80. भिकाजी दाजी
  81. अनंत गोलतकर
  82. किसन वीरकर
  83. सुखलाल रामलाल बंसकर
  84. पांडूरंग विष्णू वाळके
  85. फुलवरी मगरु
  86. गुलाब कृष्णा खवळे
  87. बाबूराव देवदास पाटील
  88. लक्ष्मण नरहरी थोरात
  89. ठमाबाई विठ्ठल सूर्यभान
  90. गणपत रामा भुते
  91. मुनशी वझीऱअली
  92. दौलतराम मथुरादास
  93. विठ्ठल नारायण चव्हाण
  94. देवजी शिवन राठोड
  95. रावजीभाई डोसाभाई पटेल
  96. होरमसजी करसेटजी
  97. गिरधर हेमचंद लोहार
  98. सत्तू खंडू वाईकर
  99. गणपत श्रीधर जोशी
  100. माधव राजाराम तुरे(बेलदार)
  101. मारुती बेन्नाळकर
  102. मधूकर बापू बांदेकर
  103. लक्ष्मण गोविंद गावडे
  104. महादेव बारीगडी
  105. कमलाबाई मोहित
  106. सीताराम दुलाजी घाडीगावकर


वैशाख मासारंभ

वैशाख मास सुरु, महिनाभर लक्षात ठेवा या खास गोष्टी


वैशाख शुद्ध प्रतिपदा, शके १९४२
वैशाख हा एक हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनांकानुसार दुसरा महिना आहे.
सूर्य जेव्हा वृषभ राशीमध्ये प्रवेश करतो, तेव्हा भारतीय सौर वैशाख महिन्याची सुरुवात होते.


हिंदू पंचांगानुसार शनिवार, २४ एप्रिलपासून वैशाख मास सुरु झाला आहे. हा मास २२ मेपर्यंत राहील. या महिन्यात भगवान विष्णूची विशेष रुपात पूजा केली जाते आणि पिंपळा पाणीअर्पण करणे याला खूप महत्त्व आहे. या दिवसापासून वैशाख मास स्नानाला सुरुवात होते. स्कंद पुराणामध्ये वैशाख मासाला सर्व मासांमध्ये उत्तम मानण्यात आले आहे. वैशाख मासात जो व्यक्ती सूर्योदयापूर्वी स्नान करतो, व्रत ठेवतो त्याला भगवान विष्णूची विशेष कृपा प्राप्त होते. श्रीहरी कृपेने घरातील दरिद्रता दूर होऊ शकते. सर्व दुःखातून मुक्ती मिळते आणि अक्षय पुण्याची प्राप्ती होते. वैशाख मासाचे देवता भगवान मधुसूदन असून या मासात जल दानाचे विशेष महत्त्व आहे.

स्कंद पुराणातील उल्लेखानुसार महिरथ नावाच्या राजाने केवळ वैशाख स्नान करून वैकुंठधाम प्राप्त केले. या महिन्याचे व्रत करणाऱ्या व्यक्तीने दररोज सूर्योदयापूर्वी तीर्थ स्थळावर, तलाव, नदी किंवा घरातच स्नान करावे. घरात स्नान करताना पवित्र नद्यांचा उच्चार करावा. स्नान करून सूर्योदयाच्या वेळी सूर्याला अर्घ्य द्यावे.


अर्घ्य देताना खालील मंत्राचा जप करावा - वैशाखे मेषगे भानौ प्रात: स्नानपरायण:। अध्यं तेहं प्रदास्यामि गृहाण मधुसूदन।।

वैशाख महिन्यातील सण
वैशाख शुद्ध तृतीया -अक्षय्य तृतीया, परशुराम जयंती. वैशाख शुद्ध पंचमी -आद्य शंकराचार्य जयंती. वैशाख शुद्ध चतुर्दशी (नृसिंह चतुर्दशी) -नृसिंह जयंती; छिन्नमस्ता जयंती. वैशाख पौर्णिमा -बुद्ध पौर्णिमा; भृगु जयंती, वैशाख कृष्ण प्रतिपदा -नारद जयंती. वैशाख अमावस्या -शनैश्चर जयंती.
पश्चिम बंगाल-बांगलादेश या भागांत ग्रीष्म ऋतूतील वैशाख महिन्यात पडणाऱ्या वादळी पावसाला कालबैसाखी म्हणतात.


भगवान विष्णूचे 10 अवतार


    श्री देवविष्णू एकूण दहा अवतारअसल्याचे मानले जाते. ते दहा अवतार पुढील प्रमाणे आहेत.
  • मत्स्य
  • कूर्म
  • वराह
  • नरसिंह
  • वामन (बटू ब्राह्मण) दक्षिण भारतात उपेन्द्र नावाने ओळखले जाते.
  • परशुराम
  • श्रीराम
  • कल्कि
  • श्रीकृष्ण
  • श्रीबलराम कृष्णाचा मोठा भाऊ होता, त्याला शेषनाग अवतार मानले जाते. त्यांचा जन्म वासुदेवच्या दुसरी पत्नी रोहिणीच्या गर्भापासून झाला. आणि विष्णूचा ९ व्या रूपाला महाराष्ट्र पंढरपूरात श्रीविठ्ठलाला आणि तिरुपतित तिरुपती येथे वेंकटेश्वर या बालाजीचे(विष्णू).विख्यात मंदिर आहे काही लोक मानतात , काही लोक सिद्धार्थ बुद्ध (लुंबिनी, नेपाळ) मानतात

मराठी महिने




हिंदू किंवा भारतीय महिने (आणि त्या महिन्यांशी समकालीन इंग्रजी महिने)

एका महिन्यात सर्वसाधारण ३० दिवस असतात.

अरबी किंवा युरोपियन महिन्यांच्या तुलनेत भारतीय हिंदू महिने अधिक अचूक आणि वैज्ञानिक आहेत.




१) चैत्र  -  (एप्रिल ते मे) चैत्र एप्रिल मध्ये अमावास्येपासून सुरुवात होते. या महिन्याच्या पहिल्या दिवसाला गुढी पाडवा म्हणतात, जो हिंदू नवीन वर्षाचा दिवस म्हणून ओळखला जातो.

२) वैशाख - (मे ते जून) वैशाख हा पीक कापणीचा हंगाम आणि हिंदू कॅलेंडरचा दुसरा महिना आहे.

३) ज्येष्ठ- (जून ते जुलै) या काळात महाराष्ट्रातील वट पौर्णिमा साजरी करतात. हिंदु दिनदर्शिकेचा हा तिसरा महिना आहे.

४) आषाढ - (जुलै ते ऑगस्ट) या चौथ्या महिन्यात महाराष्ट्रातील लोक गुरुपौर्णिमा साजरा करतात आणि आषाढी एकादशी साजरी करतात.

५) श्रावण- (ऑगस्ट ते सप्टेंबर) हा पाचवा महिना नागपंपिमी आणि नारळी पौर्णिमेचा सण देखील आणतो.

६) भाद्रपद- (सप्टेंबर ते ऑक्टोबर) हा महिना गणेश चतुर्थीचा सण आहे.


७) आश्विन- ऑक्टोबर ते नोव्हेंबर नवरात्र, दुर्गापूजा, कोजागिरी, दशरा आणि दिवाळी हे सण अश्विनच्या सातव्या महिन्यात साजरे करतात.

८) कार्तिक - (नोव्हेंबर ते डिसेंबर) हा भाऊबीज कार्तिक महिन्यात साजरा केला जातो.

९) मार्गशीर्ष - (डिसेंबर ते जानेवारी) मार्गशीर्ष लक्ष्मी पूजन म्हणजे देवी लक्ष्मीची उपासना होय.

१०) पौष / पुस - (जाने ते फेब्रुवारी) पौष अमावस्या या महिन्यात साजरा केला जातो.

११) माघ - (फेब्रुवारी ते मार्च) या महिन्यात महाशिवरात्री साजरी केली जाते. या दिवशी लोक भगवान महादेवाची पूजा करतात. मकर संक्रांती देखील या महिन्यात साजरी केली जाते.

१२) फाल्गुन - (मार्च ते एप्रिल) हा हिंदू दिनदर्शिकेत मागचा महिना आहे. या महिन्यात होळी साजरी केली जाते.

एका हिंदू महिन्यात दोन पक्ष (पंधरवडे) असतात. शुक्लपक्ष (किंवा शुद्ध पक्ष) आणि कृष्णपक्ष (किंवा वद्य पक्ष). शुक्ल पक्षात डोळ्याने दिसणारी चंद्राची कोर दिवसागणिक आकारमानाने मोठी होत जाते व पौर्णिमेला पूर्ण वर्तुळाकार पांढरे शुभ्र चंद्रबिंब दिसते. कृष्णपक्षात चंद्र दिवसेंदिवस वर्तुळाहून लहान लहान होत जातो व शेवटी अमावास्येला चंद्र अदृश्य (पूर्ण काळा) होतो.

मध्य व उत्तरी भारतात हिंदू महिने पौर्णिमान्त्त, तर दक्षिणी भारतात ते अमावास्यान्त असतात. दोन्ही पद्धतीत शुक्ल पक्षात महिन्याचे नाव तेच असते, परंतु नंतरच्या कृष्ण पक्षात उत्तरी भारतात पुढचा महिना चालू झालेला असतो.
उदा० चैत्र शुक्ल (दक्षिणी भारत) = चैत्र शुक्ल (उत्तरी भारत)
परंतु, चैत्र कृष्ण (दक्षिणी भारत) = वैशाख कृष्ण (उत्तरी भारत)

हिंदू महिने हे हिंदू सणांच्या सोईसाठी आहेत. हिंदू महिन्यातील विशिष्ट तिथीला विशिष्ट सण येतो. हिंदू महिने हे चंद्राच्या पृथ्वीभोवती होणार्‍या प्रदक्षणेवरून ठरवले जातात. त्यामुळे ही चांद्र कालगणना आहे. साधारणपणे दर तीन वर्षांनी एका अधिक महिन्याची भर घालून हिंदू महिने सौर कालगणनेच्या बरोबरीला आणले जातात. हिंदू पंचांगातला मकरसंक्रांत हा सण सौर पद्धतीचा आहे.

भारत सरकारने राष्ट्रीय पंचांग बनवताना हिंदू महिन्यांची नावे वापरली आहेत.

ख्रिस्ती महिने किंवा इंग्रजी महिने हे पृथ्वीच्या सूर्याभोवती होणार्‍या प्रदक्षणेवर आधारलेले आहेत. अर्थात ते सौर महिने आहेत.

ख्रिस्ती, इंग्रजी किंवा युरोपियन महिने (आणि समकालीन हिंदू महिने)

जानेवारी (पौष-माघ)
फेब्रुवारी (माघ-फाल्गुन)
मार्च (फाल्गुन-चैत्र)
एप्रिल (चैत्र-वैशाख)
मे (वैशाख-ज्येष्ठ)
जून (ज्येष्ठ-आषाढ)
जुलै (आषाढ-श्रावण)
ऑगस्ट (श्रावण-भाद्रपद)
सप्टेंबर (भाद्रपद-आश्विन)
ऑक्टोबर (आश्विन-कार्तिक)
नोव्हेंबर (कार्तिक-मार्गशीर्ष)
डिसेंबर (मार्गशीर्ष-पौष)

मुसलमानी किंवा अरबी महिने

मोहरम
सफर
रबिउल अव्वल
रबि उस्सानी
जमादिल अव्वल
जमादुस्सानी
रज्जब
शाबान
रमजान
शव्वाल
जिल्काद
जिल्हेज

मुसलमानी महिने हे हिंदू महिन्यांप्रमाणेच चांद्रमानावरून ठरवले जातात. पण हिंदू महिन्यांप्रमाणे अधिक महिन्याची व्यवस्था नसल्याने मुसलमानी महिने सौर कालगणनेच्या मागेमागे पडत जातात.

पारशी महिने

फारवर्दिन
आर्दीबेहेस्त
खोर्दाद
तीर
अमरदाद
शेहरेवर
मेहेर
आबान
आदर
दए
बहमन
स्पेन्दामर्द

पंजाबी तथा शीख महिने

बैसाख
जेठ
हाड
सावन
भादो
असू
कत्तक
मगर
पोह
माघ
फागुन
चेत