वैशाख मासारंभ

वैशाख मास सुरु, महिनाभर लक्षात ठेवा या खास गोष्टी


वैशाख शुद्ध प्रतिपदा, शके १९४२
वैशाख हा एक हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनांकानुसार दुसरा महिना आहे.
सूर्य जेव्हा वृषभ राशीमध्ये प्रवेश करतो, तेव्हा भारतीय सौर वैशाख महिन्याची सुरुवात होते.


हिंदू पंचांगानुसार शनिवार, २४ एप्रिलपासून वैशाख मास सुरु झाला आहे. हा मास २२ मेपर्यंत राहील. या महिन्यात भगवान विष्णूची विशेष रुपात पूजा केली जाते आणि पिंपळा पाणीअर्पण करणे याला खूप महत्त्व आहे. या दिवसापासून वैशाख मास स्नानाला सुरुवात होते. स्कंद पुराणामध्ये वैशाख मासाला सर्व मासांमध्ये उत्तम मानण्यात आले आहे. वैशाख मासात जो व्यक्ती सूर्योदयापूर्वी स्नान करतो, व्रत ठेवतो त्याला भगवान विष्णूची विशेष कृपा प्राप्त होते. श्रीहरी कृपेने घरातील दरिद्रता दूर होऊ शकते. सर्व दुःखातून मुक्ती मिळते आणि अक्षय पुण्याची प्राप्ती होते. वैशाख मासाचे देवता भगवान मधुसूदन असून या मासात जल दानाचे विशेष महत्त्व आहे.

स्कंद पुराणातील उल्लेखानुसार महिरथ नावाच्या राजाने केवळ वैशाख स्नान करून वैकुंठधाम प्राप्त केले. या महिन्याचे व्रत करणाऱ्या व्यक्तीने दररोज सूर्योदयापूर्वी तीर्थ स्थळावर, तलाव, नदी किंवा घरातच स्नान करावे. घरात स्नान करताना पवित्र नद्यांचा उच्चार करावा. स्नान करून सूर्योदयाच्या वेळी सूर्याला अर्घ्य द्यावे.


अर्घ्य देताना खालील मंत्राचा जप करावा - वैशाखे मेषगे भानौ प्रात: स्नानपरायण:। अध्यं तेहं प्रदास्यामि गृहाण मधुसूदन।।

वैशाख महिन्यातील सण
वैशाख शुद्ध तृतीया -अक्षय्य तृतीया, परशुराम जयंती. वैशाख शुद्ध पंचमी -आद्य शंकराचार्य जयंती. वैशाख शुद्ध चतुर्दशी (नृसिंह चतुर्दशी) -नृसिंह जयंती; छिन्नमस्ता जयंती. वैशाख पौर्णिमा -बुद्ध पौर्णिमा; भृगु जयंती, वैशाख कृष्ण प्रतिपदा -नारद जयंती. वैशाख अमावस्या -शनैश्चर जयंती.
पश्चिम बंगाल-बांगलादेश या भागांत ग्रीष्म ऋतूतील वैशाख महिन्यात पडणाऱ्या वादळी पावसाला कालबैसाखी म्हणतात.


भगवान विष्णूचे 10 अवतार


    श्री देवविष्णू एकूण दहा अवतारअसल्याचे मानले जाते. ते दहा अवतार पुढील प्रमाणे आहेत.
  • मत्स्य
  • कूर्म
  • वराह
  • नरसिंह
  • वामन (बटू ब्राह्मण) दक्षिण भारतात उपेन्द्र नावाने ओळखले जाते.
  • परशुराम
  • श्रीराम
  • कल्कि
  • श्रीकृष्ण
  • श्रीबलराम कृष्णाचा मोठा भाऊ होता, त्याला शेषनाग अवतार मानले जाते. त्यांचा जन्म वासुदेवच्या दुसरी पत्नी रोहिणीच्या गर्भापासून झाला. आणि विष्णूचा ९ व्या रूपाला महाराष्ट्र पंढरपूरात श्रीविठ्ठलाला आणि तिरुपतित तिरुपती येथे वेंकटेश्वर या बालाजीचे(विष्णू).विख्यात मंदिर आहे काही लोक मानतात , काही लोक सिद्धार्थ बुद्ध (लुंबिनी, नेपाळ) मानतात



वैशाख मासात कोणते उपाय करावेत आणि वैशाख मासाशी सबंधित काही खास गोष्टी…

वैशाख मासामध्ये करावेत हे उपाय - 1. वैशाख व्रताची कथा ऐकावी 2. ऊँ नमो भगवते वासुदेवाय नम: मंत्राचा जप करावा 3. व्रत करणाऱ्या व्यक्तीने दिवसातून एकदाच जेवण करावे 4. वैशाख मासात जल दानाचे विशेष महत्त्व आहे. शक्य असल्यास या महिन्यात एखाद्या ठिकाणी पाणपोईची व्यवस्था करावी. 5. एखाद्या गरजू व्यक्तीला पंखा, टरबूज किंवा इतर फळ दान करावे.

हिंदू पंचागानुसार दुसरा मास आहे वैशाख -
हिंदू पंचांगानुसार चैत्र मासानंतर दुसरा वैशाख मास असतो. हा मास अत्यंत पवित्र आणि पूजन कर्मासाठी श्रेष्ठ मानला जातो, कारण या मासाचा संबंध विविध देव अवतारांशी आहे. प्राचीन काळापासून या महिन्याच्या शुक्ल पक्षातील अक्षय तृतीया तिथीला भगवान विष्णूंचे नर-नारायण, परशुराम, नृसिंह आणि ह्ययग्रीव रूपातील अवतार प्रकट झाले आहेत. शुक्ल पक्षातील नवमी तिहीला देवी सीता जमिनीतून प्रकट झाली आहे. चार धाममधील एक बद्रीनाथ धामाचे दरवाजे वैशाख मासातील अक्षय तृतीयेपासून उघडले जातात. वैशाख मासातील शुक्ल पक्षातील द्वितीया तिथीला भगवान जगन्नाथची रथयात्रा निघते. या महिन्यात करण्यात आलेल्या दान, स्नान, जप, यज्ञ इ. शुभ कर्मांनी अक्षय पुण्याची प्राप्ती होते.वैशाख महिन्यात विष्णूची (मधुसूदन) पूजा करतात. धर्म ग्रंथानुसार सूर्यदेव मेष राशीत आल्यानंतर वैशाख महिन्यात प्रातःस्नानाचे व्रत करावे. स्नान झाल्यानंतर विष्णूची पूजा करावी आणि खाली दिलेला मंत्र म्हणून प्रार्थना करावी.



मधुसूदन देवेश वैशाखे मेषगे रवौ।

प्रात:स्नानं करिष्यामि निर्विघ्नं कुरु माधव।।





आपल्याला हे आवडत असल्यास कृपया आपल्या मौल्यवान टिप्पण्यांद्वारे आम्हाला कळवा !!!! आपल्याला हे उपयुक्त वाटल्यास; आपल्या प्रियजनांना सामायिक करा !!!
आपण भगवान विष्णूच्या अवतारांबद्दल अधिक जाणून घेऊ इच्छित असल्यास आम्हाला कळवा;
आम्ही आपला अपवादात्मक प्रयत्न करू.


!!मराठी मंथन!!


2 comments:

  1. मनापासून धन्यवाद!!!
    असे प्रशंसा आम्हला प्रोत्साहित करतील

    ReplyDelete